दोघे मच्छीमार बचावले ; स्थानिक मच्छीमारांकडून शोध सुरू
मालवण । प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील मेढा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली नौका वारा आणि लाटांच्या माऱ्यात पलटी होऊन तीन मच्छीमार पाण्यात फेकले गेल्याची घटना 8 जुलै रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. सदर नौकेमधील जितेश विजय वाघ (35) हे मच्छीमार बेपत्ता असून उर्वरित कीर्तिदा लीलाधर तारी (२९) आणि सचिन सुभाष केळुसकर (४२) दोन मच्छिमार बचावले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती जगताप, महादेव घागरे यांनी घटनास्थळी भेट दिली. सदर अपघातातील मासेमारी बोट किनाऱ्यावर आणण्यात आली असून बेपत्ता जितेश विजय वाघ यांचा स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोध सुरू आहे.









