Fish Festival on 12th at Jamsande Malai
देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीच्यावतीने १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता देवगड-जामसंडे मळई खाडी किनारी मत्स्य शेलफिश महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात येत आहे. देवगड तालुक्यातील पर्यटन स्थळांचा विकास व रोजगार निर्मिती या उद्देशाने समितीची वाटचाल सुरु आहे. पर्यटन समितीच्या स्थापनेपासून छोट्या उपक्रमातून येथील पर्यटन स्थळांची माहिती व महत्त्व पटवून दिण्याचा प्रयत्न करीत आहोत बांगडा फिश महोत्सव, कातळशिल्पे सहल यानंतर मत्स्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची पारंपारिक खाद्यसंस्कृती आहे. याचेच एक उदाहरण देवगड तालुक्यातील खाडी किनारचे खडकी म्हणजे शिंपल्या, कालवं, खेकडे आणि कोलंबी जे शरीरास उपयुक्त असे कॅल्शियम आणि प्रथिने मिळवून देतात. चवीला अत्यंत चविष्ठ असणाऱ्या या पदार्थाची मेजवानी वेणाऱ्या पर्यटकांना देण्यात येणार आहे. यातून स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. परिसरातील उपलब्ध नैसर्गिक साधनांमधून रोजगार उपलब्ध होऊ शकतो याचा आत्मविश्वास देण्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे. स्थानिकांना दिशा दिल्ली तरच त्यांच्यामध्ये रोजगाराची आवड निर्माण होऊन सर्वांच्या सहभागातून एक पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या अशा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक पाकनिपून महिलांनी बनवलेल्या पदार्थाची लज्जत चाखण्यासाठी पर्यटकांना व पर्यटन प्रेमींना आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अजित टाककर (२६८ ९७६ ३०१७). किरण पांचाळ (७२००५४६७७९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष प्रमोद नलावडे व सचिव टाककर यांनी केले आहे.
देवगड / प्रतिनिधी









