नेमळे । वार्ताहर
झाराप – पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे चारच्या सुमारास झालेल्या अपघातात कर्नाटकवरून गुजरातला मासे घेऊन जाणारा कंटेनर ड्रायव्हरला झोप आल्याने नेमळे कुंभारवाडी येथे हायवेच्या खाली २० फूट खाली कोसळून पलटी झाला. यात ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला असून सोबत असलेला दुसरा ड्रायव्हर सुदैवाने बचावला आहे. या अपघाताची सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.









