वृत्तसंस्था / वेलिंग्टन
न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासात नवा माईलस्टोन नोंदला जाणार असून डायना पी लीन्डन या संघटनेची पहिली महिला चेअरमन होणार आहे. विद्यमान चेअरमन मार्टिन स्नेडन यांनी मुदत संपण्याआधीच आपले पद सोडल्याने या ऐतिहासिक बदलाला चालना मिळाली.
डायना लीन्डन या सध्या उपचेअरमन म्हणून कार्यरत असून त्यांनी प्रभावी कार्य केले आहे. याशिवाय त्या न्यूझीलंड ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षही असून दोनदा अमेरिका कप स्पर्धेकरिता त्यांनी खजिनदार म्हणून काम पाहिले आहे. क्रिकेट प्रशासनात महिलांनाही समान संधी देण्याच्या दृष्टीने त्यांची नियुक्ती हे पहिले पाऊल ठरले आहे. स्नेडन यांची अजून एक वर्ष मुदत होती. बोर्डाचे एक सदस्य रॉबर्ट टूज हे स्नेडन यांच्या जागी आयसीसीमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे त्यांनी सांगितले.









