ऑपरेशन सिंदूर अंतगंत भारताच्या सशस्त्र दलांनी शनिवारी पहाटे पाकिस्तानच्या अनेक सैन्यतळांवर अचूक आणि योजनाबद्ध पद्धतीने हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये अत्याधुनिक क्षेपणास्त्रs आणि आधुनिक निर्देशित शस्त्रांचा वापर करण्यात आला, यात ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र, स्कॅल्प एअर-लाँच क्रूज क्षेपणास्त्र आणि हॅमर गायडेड म्युनिशनसारखी शस्त्रास्त्रs सामील होती असे समजते.
भारतीय वायुदलाच्या राफेल लढाऊ विमानांद्वारे डागण्यात आलेल्या या शस्त्रास्त्रांनी पाकिस्तानी वायुदलाची रणनीतिक स्वरुपात महत्त्वपूर्ण ठिकाणं रफीकी (झंग), मुरिद (चक्कवाल), रहीम यार खान, सुक्कुर आणि चुनीयां (कसूर)ला लक्ष्य केले. स्कर्दू, भोलारी, जॅकबाबाद आणि सरगोधाच्या वायुतळालाही मोठे नुकसान झाले. तर पस्रूर आणि सियालकोटमध्ये रडार ठिकाणांना अचूक अस्त्रांनी ध्वस्त करण्यात आले.
भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या वापराची औपचारिक पुष्टी देण्यात आलेली नाही, परंतु या क्रूज क्षेपणास्त्राचा संघर्षात पहिल्यांदाच वापर करण्यात आल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. हे क्षेपणास्त्र भारतीय वायुदल आणि नौदलाच्या सर्वात धोकादायक अस्त्रांपैकी एक मानले जाते.
भारतीय सैन्याने केवळ सैन्य आणि सुरक्षा यंत्रणांनाच लक्ष्य केले, यात कमांड अँड कंट्रोल सेंटर, रडार स्टेशन, युएव्ही बेस आणि शस्त्रास्त्रसाठ्याचा समावेश होता. मुरिद वायुतळ पाकिस्तानी ड्रोन आणि युएव्ही हालचालींचे मुख्य केंद्र आहे. तर रफीकी वायुतळावर लढाऊ विमानांची स्क्वाड्रन तैनात आहे. चकलाला येथील नूर खान तळावर पाकिस्तानी वायुदलाची मोठी परिवहन क्षमता आणि इंधन भरणाऱ्या विमानांची तैनात आहे.









