तरुणभारत ऑनलाइन टीम
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.गेल्या बऱ्याच दिवसांपासून तिच्या हनिमून फोटोंमुळे चर्चेत आहे. कोरोनाकाळात तिला थाटामाटात लग्न करता आलं नाही.आणि हनिमूनला देखील जाता आलं नाही. म्हणूनच यावर्षी तिने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सर्व हौस पुरवून घेतली आहे. तिने पुन्हा पती कुणाल बेनोडेकरबरोबर लग्नगाठ बांधली. नवविवाहित जोडप्यासारखंच ती प्रत्येक क्षण जगत आहे. आता तिने सासरी केलेल्या पहिल्या पदार्थाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सोनालीने सासरी पहिल्यांदाच स्वयंपाक बनवला आहे. सोनालीने फोटो शेअर करत म्हटलं आहे की, “सासरी केलेला पहिला पदार्थ, तांदळाची खीर”. सोनालीने सासरी पहिल्यांदाच गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर बनवली. कपाळाला कुंकू, हातात तांदळाच्या खीरने भरलेल्या वाट्या, गळ्यात लांब मंगळसुत्र आणि कुर्ता सोनालीने परिधान केलेला दिसत आहे.