वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 ची आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा रविवार दि. 19 नोव्हेंबरला संपणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला 23 नोव्हेंबरपासून रायपूरमध्ये प्रारंभ होत आहे. रायपूरच्या शहिद वीर नारायण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर हा सामना चुरशीचा होईल. उभय संघादरम्यानच्या द्विपक्षीय मालिका आयोजनाचा हा एक भाग आहे.
या मालिकेतील चौथा सामना नागपूरमध्ये खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण या सामन्याचे ठिकाण आता बदलण्यात आले असून हा सामना रायपूरमध्ये घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. पाच सामन्यांची टी-20 मालिका 1 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. नागपूरमध्ये चौथा टी-20 सामना खेळविण्याचा निर्णय या पूर्वी घेण्यात आला होता. त्यानंतर कांही तांत्रिक समस्येमुळे या सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. आता हा सामना रायपूरच्या स्टेडियमध्ये खेळविला जाईल.









