होणार नाही कुठलाच आनुवांशिक आजार
जगातील पहिले सुपरकिड जन्मले आहे. सुपरपॉवर असणाऱ्या या सुपरबेबीला कुठल्याही प्रकारचा जेनेटिक म्हणजेच आनुवांशिक आजार नसेल. तसेच यात कुठलेही नुकसानदायक जेनटिक म्युटेशन नसणार आहे. कारण या मुलामध्ये केवळ त्याच्या आईवडिलांचा डीएनएए नसून तिसऱ्या व्यक्तीचा डीएनएडी जोडण्यात आला आहे. हे मूल इंग्लंडमध्ये जन्माला आले आहे.
या मुलाला जन्म देण्यासाठी तीन जणांच्या डीएनएचा वापर करण्यात आला आहे. डीएनएचे वैशिष्ट्या कायम राखण्यासाठी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. या मुलामध्ये कुठल्याही प्रकारचा जेनेटिक आजार नसेल, असा दावा करण्यात आला आहे.
मायटोकॉन्ड्रियल डोनेशन ट्रीटमेंट (एमडीटी) द्वारे या मुलाचा जन्म घडवून आणला गेला आहे. हा भ्रूण ज्या गर्भात वाढला, ती महिला देखील आनुवांशिक आजारांपासून सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले, म्हणजे आईच्या शरीरात होणाऱ्या आजारांचा या मुलावर कुठलाच परिणाम होणार नाही.
थ्री-पॅरेंट बेबी
या भ्रूणात बायोलॉजिकल आईवडिलाहंच्या स्पर्म आणि एग्सच्या मायटोकॉन्ड्रियाला मिळविण्यात आले आहे. मायटोकॉन्ड्रिया कुठल्याही पेशींचे पॉवरहाउस असते. या मुलाच्या शरीरात आईवडिलांसाब्sात तिसरी महिला डोनरच्या जेनेटिक मटेरियलमधून 37 जीन सामील आहेत. म्हणजेच हे मूल प्रत्यक्षात थ्री-पॅरेंट बेली आहे. परंतु या मुलाच्या शरीरात 99.8 टक्के डीएनए त्याच्या आईवडिलांपासूनच प्राप्त आहेत.

आईकडूनच मिळते पॉवरहाउस
मायटोकॉन्ड्रियल डोनेशन ट्रीटमेंटला मायटोकॉन्ड्रियल रीप्लेसमेंट ट्रीटमेंट देखील म्हटले जाते. ही पद्धती इंग्लंडच्या डॉक्टरांनी विकसित केली आहे. या मुलाचा इंग्लंडच्या न्यूकॅसल फर्टिलिटी सेंटरमध्ये जन्म झाला आहे. आईवडिलांचे आनुवांशिक आजार हस्तांतरित होऊ नये अशाप्रकारचे मूल जन्माला घालणे हा या मागील उद्देश होता. सर्वसाधारणपणे कुठलेही मू स्वत:च्या आईकडूनच मायटोकॉन्ड्रिया प्राप्त करते.
जेनेटिक आजारांपासून मुक्त
नुकसानदायक म्युटेशन हे या पॉवरहाउसमध्ये जमा राहतात. नंतर त्यांच्याकडून मुलांच्या प्रकृतीवर प्रभाव पडत असतो. जेनेटिक आजारांनी ग्रस्त महिलांना सर्वसाधारपणे नैसर्गिक दृष्ट्या गर्भधारणेत समस्या उद्भवत असते. तसेच अशा महिलांच्या मुलांना भविष्यात गंभीर आजारांना तोंड द्यावे लागू शकते. जगात 6 हजार मुलांपैकी एक जण मायटोकॉन्ड्रियल आजारांना सामोरा जात असतो. सर्वसाधारपणे मानवी शरीरात प्रत्येक पेशीचे केंद्र म्हणजेच न्युक्लियसमध्ये 20 हजार जीन्स असतात. प्रत्येक न्युक्लियसच्या चहुबाजूला छोट्या-छोट्या बिंदूंप्रमाणे मायटोकॉन्ड्रिया असतात, ज्यांचे स्वत:चे जीन्स असतात. मायटोकॉन्ड्रिया योग्यप्रकारे काम करत असल्यास तो पेशींना ऊर्जा देतो. जर एखादे जेनेटिक म्युटेशन असल्यास मायटोकॉन्ड्रिया डॅमेज होतो आणि मग तो ऊर्जा संपवितो. याचा प्रभाव मेंदू, हृदय, स्नायू आणि यकृतावर पडतो, यामुळे मुलाचा विकास योग्यप्रकारे होत नाही.
बदलण्यात आला कायदा
एमडीटी तंत्रज्ञानाच्या प्रारंभासाठी इंग्लंडच्या संसदेने 2015 मध्ये कायद्यात बदल केला होता. दोन वर्षांनी न्यूकॅसल क्लीनिक इंग्लंड हे तंत्रज्ञान वापरण्याचा परवाना मिळविणारे पहिले केंद्र ठरले. या केंद्राने ह्युमन फर्टिलायझेशन अँड एंब्रियोलॉजी अथॉरिटीकडून मंजुरी मिळवत प्रयोग साकारला आहे. आता या क्लीनिकच्या डॉक्टरांनी या सुपरकिडला जन्माला घालण्याची पूर्ण प्रक्रिया सार्वजनिक केली आहे.









