ऑनलाईन टीम / तरुण भारत :
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाला महाराष्ट्रात पहिलं यश मिळालं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आंबेलोहळ गावाच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बीआरएसचे उमेदवार गफार सरदार पठाण विजयी झाले आहेत.
के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रात आपल्या पक्षाचे स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील आगामी निवडणुका लक्षात घेता त्यांनी नांदेडमध्ये दोन आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एक सभा घेतली होती. यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाला पहिलं यश आलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ गावात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बीआरएसचे उमेदवार गफार पठाण विजयी झाले. बीआरएस पक्षाचा राज्यातील हा पहिला विजय आहे.
दरम्यान, बीआरएसकडून पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असून, अनेक माजी आमदार, खासदारांसह नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यात येत आहे.







