वृत्तसंस्था /नवी दिल्ली
फर्स्ट सोलर 3.5 जीडब्ल्यू सोलर मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करण्याची योजना आखत आहे आणि त्यासाठी तामिळनाडूमध्ये एक जागा निवडली असल्याचे समजते. फर्स्ट सोलारचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (भारत) सुजॉय घोष म्हणाले की, कंपनी आगामी काळात 20 जीडब्ल्यूच्या जागतिक उत्पादन लक्ष्याच्या जवळ पोहचण्यासाठी प्रयत्न करणार आहे. घोष म्हणाले की 2022 च्या अखेरीस, यूएस, व्हिएतनाम आणि मलेशियामधील आमच्या युनिट्समधून दरवर्षी 10 जीडब्ल्यू सौर मॉड्यूलचे जागतिक उत्पादन घेतले जात आहे. 2025 पर्यंत 20 जीडब्ल्यू क्षमता गाठण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. हे अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये वाढत्या विस्ताराने होईल. सोबतच व्हिएतनाम आणि मलेशिया आपले योगदान देत राहणार असल्याचे यावेळी म्हटले आहे. घोष म्हणाले की, सौर क्षेत्रात आमच्या उत्पादनांना मागणी होत असल्याने परिणामी कंपनीला आपल्या सौर उत्पादनात वाढ करणे अपरिहार्य ठरते आहे. भारताची सौर उपकरणांची मागणी मोठ्या प्रमाणात आयातीद्वारे पूर्ण केली जाते. सुमारे 85 टक्के भारतीय सौर क्षमता आयातित सेल आणि मॉड्यूल्सवर तयार केली जाते, बहुतेक चीनमधून उपकरणांची आयात केली जाते. गेल्या वर्षी, केंद्राने देशांतर्गत सौर उत्पादनांना समर्थन देण्यासाठी आणि चीनी आयातीला आळा घालण्यासाठी आयातीत सौर सेलवर 25 टक्के आणि आयातीवर 40 टक्के सीमाशुल्क लादले आहे. फर्स्ट सोलर हे उच्च कार्यक्षमतेच्या सौर मॉड्यूल्ससाठी केंद्राच्या उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेच्या पहिल्या फेरीतील तीन विजेत्यांपैकी एक होते. ही कंपनी जगातील टॉप 10 सोलर उत्पादकांपैकी एक राहिली आहे.









