प्रतिनिधी,कोल्हापूर
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीने गेल्या तीन वर्षात सर्वसाधारण सभा घेऊन अर्थव्यवहाराचा हिशोब दिलेला नाही. तरीही अध्यक्ष, उपाध्यक्षांनी वेगवेगळा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या वादावर पडदा टाकण्यासाठी धर्मादाय सहाय्यक उपायुक्तांनी महामंडळाचा ताबा घेत, हिशोब न घेताच पहिल्यांदा जुन्या आणि दुसऱयांदा नवीन घटनेनुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या निवडणूक प्रक्रियेवरही आमचा आक्षेप आहे. त्यामुळे धर्मादाय सहाय्यक उपायुक्तांनी चित्रपट महामंडळावर प्रशासक नेमून सर्वसाधारण सभा घेऊन पहिल्यांदा तीन वर्षाच्या पैशांचा हिशोब घ्यावा, मगच निवडणूक घ्यावी, अशी मागणी महामंडळाच्या सदस्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
अमर मोरे म्हणाले, चित्रपट महामंडळाचे सर्व संचालक एकत्रित येत सदस्य हिताचे कोणतेही काम न करता, एकमेकांवर आरोप करून, सदस्यांची दिशाभूल करीत आहेत. नवीन अध्यक्ष, उपाध्यक्षांनी जुन्या अध्यक्ष, उपाध्यक्षांवर गुन्हा दाखल करायचा आणि कोर्टाच्या फेऱया मारून वकीलांचे खिसे भराचे. यापलिकडेच काहीच काम केले जात नाही. सध्याच्या संचालक मंडळाने गेल्या तीन वर्षात सभासदांनी भरलेल्या वर्गणीचा, 1 कोटी 49 लाख रूपयांच्या मोडलेल्या एफडीचा आणि वैयक्तिक खात्यावरून आणि रोख रक्कमेने केलेल्या व्यवहाराचा पहिल्यांदा हिशोब द्यावा. अवधुत जोशी म्हणाले, धर्मदाय सहाय्यक उपायुक्त पंधरा दिवसात कोणत्या आधारावर नवीन घटना मंजूर करतात, तसेच ऑडीट रिपोर्टवर सीए यांनी मारलेला शेरा न पाहता डोळे झाकून दोघांच्या सहीने मान्य करतात. या सर्व गोष्टी संशयास्पद आहेत.
आम्हाला निवडणूक हवी आहे, परंतू ती पैशाच्या हिशोबानंतरच नियमानुसार घ्यावी. त्यामुळे धर्मदाय उपायुक्तांनी प्रशासक नेमून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसाधारण सभा घ्यावी, तीन वर्षाच्या पैशाचा हिशोब घ्यावा, त्यानंतरच निवडणूक घ्यावी, अशी मागणी केली. यावेळी बाबा लाड, विक्रम बिडकर, निलेश जाधव आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









