सावंतवाडी /प्रतिनिधी
First Principal of Ayurveda Dr. Surendra Parkar passed away
येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद कॉलेजचे पहिले प्राचार्य डॉ. सुरेंद्र पारकर यांचे बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता नवी मुंबई वाशी येथे निधन झाले. कुटुंबासह ते वाशी येथे राहात होते. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. १९८४ पासून २००१ पर्यंत त्यांनी प्राचार्य म्हणून काम केले होते. आयुर्वेद कॉलेजच्या उभारणीत व कॉलेजचा नावलौकिक वाढविण्यात त्यांचे योगदान होते. कॉलेजतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.









