ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर आज बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका निर्णायक ठरली.
बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर खंबायत यांच्या अधिपत्याखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी अजित पवार यांच्या सूचनेनुसार अध्यक्षपदासाठी पोपटराव गावडे व उपाध्यक्ष पदासाठी संतोष शिंदे यांनी नावे जाहीर केली. त्यानुसार नवनिर्वाचित संचालक मंडळाने पदाधिकाऱ्यांना बिनविरोध निवडून दिले.
अध्यक्षपदी पोपटराव सोमनाथ गावडे (रा. कऱहावागज) तर उपाध्यक्षपदी संतोष मारुती शिंदे (रा. मुर्टी) यांची बिनविरोध निवड झाली असून, या दोन्ही पदाधिकाऱ्यांना एक वर्षाचा कार्यकाळ ठरवून दिला आहे.








