गणेशोत्सवापूर्वी चार दिवस अगोदर ‘सिंगल विंडो’ सुरू करण्याचा प्रकार : कार्यकर्त्यांची होतेय धावपळ
प्रतिनिधी / बेळगाव
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध खात्यांकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. याकरिता सिंगल विंडो सुविधा उपलब्ध करण्यात येते. मात्र मंडप उभारणीस प्रारंभ झाला असून प्रशासनाने अद्याप मंडप परवानगीसाठी सिंगल विंडो सुविधा सुरू केली नाही. त्यामुळे मंडप उभारणीनंतर परवानगी घ्यायची का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. सिंगल विंडो सुविधा कधीपासून सुरू करणार? अशी विचारणा होत आहे.
शहरातील गणेशोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक गल्लोगल्ली गणरायांची प्रति÷ापना करून हा सण साजरा करण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. ठिकठिकाणी मंडप उभारणीच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र विद्युतजोडणी, मंडप घालण्यासाठी परवानगी घेणे तसेच स्पीकर लावण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासन आणि हेस्कॉमकडून परवानगी घ्यावी लागते. याकरिता प्रशासनाकडून एकाच छताखाली सर्व परवानगी देण्यासाठी सिंगल विंडो सुविधा सुरू करण्यात येते. यापूर्वी आठ दिवस आधी सिंगल विंडो सुविधा सुरू करण्यात येत होती. मात्र अलीकडे ही सुविधा गणेशोत्सवापूर्वी चार दिवस आधी सुरू करण्यात येत आहे.
त्यामुळे मंडप उभारणीनंतर परवानगी घेण्याची वेळ आली आहे. तर गणरायांच्या प्रति÷ापनेसाठी विविध मंडळे मंडप उभारणी आणि सजावटीसाठी पंधरा दिवस आधी सुरुवात करतात. आकर्षक देखावे आणि सजावट करण्यास वेळ लागत असल्याने मंडप उभारणी करावी लागते. पण परवानगी घेण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीच सुविधा उपलब्ध केली जात नाही. त्यामुळे मंडप उभारणीनंतर परवानगीसाठी मंडळाचे कार्यकर्ते धावपळ करताना दिसतात. हा प्रकार नेहमीचाच बनला असून आवश्यक परवानगी देण्यासाठी सिंगल विंडो सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे.
सुविधेचा अभाव…
- ठिकठिकाणी मंडप उभारणीच्या कामास प्रारंभ
- प्रशासनाकडून कोणतीच सुविधा उपलब्ध नाही
प्रशासनाने दखल घ्यावी
गणेशोत्सवाच्या तेंडावर परवानगीसाठी कार्यकर्त्यांना विविध कार्यालयांच्या पायऱया झिजवाव्या लागतात. गणेशोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपल्यानंतर परवानगी घेण्याकरिता कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी कार्यकर्त्यांना धावपळ करावी लागते. जर आधीपासूनच परवानगी देण्याची सुविधा उपलब्ध केल्यास ऐनवेळी घाईगडबड करण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे सिंगल विंडो सुविधा तातडीने सुरू करण्याच्या
दृष्टीने प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.









