जगन्नाथ मुळवी /मडकई
राज्य सरकारतर्फे आमदारांना देण्यात येणारा आमदार निधी सर्वप्रथम मडकई मतदारसंघासाठी उपलब्ध करुन मडकई मतदारसंघाची विकासात्मक दृष्ट्या मान उंचावलेली आहे. त्यासाठी आपण सर्वांत आधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल यांचे अभिनंदन करुन त्यांना धन्यवाद देत असल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आपल्या खास मुलाखतीत सांगितले.
आमदार निधीतुन कुठल्या विकासकामांना प्राधान्य देणार
आमदार निधीतून ढवळी येथील ग्रामदेवी भगवती मंदिराचे सुशोभीकरण तसेच दहाजण समाजाच्या सत्यनारायण मंदिराच्या सभागृहाच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम हाती घेऊन सुशोभीकरण करण्याचा मानस आहे. आज शनिवार दि. 22 रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर या दोन्ही कामांचे भव्य स्वरुपात भुमीपुजन व पायाभरणी सोहळा स्वहस्ते होत असल्याबद्दल अभिमान वाटतो. विकास कामामध्ये नेहमीच अग्रेसर असलेला मडकई मतदार संघ गोवा राज्यात आमदार निधीचा पहिला मानकरी ठरला, यापेक्षा मोठा आंनद नाही. मंदिराचा परिसर सुशोभीत केल्यामुळे येथील निसर्गंसौंदर्यात भर पडणार आहे.
आमदार निधी विषयी सभागृहात चर्चा केव्हा झाली
माजी मुख्यमंत्री स्व मनोहर पर्रिकर यांच्या कारकीर्दीत 2012 साली आमदार निधी विषयी सभागृहात चर्चा झाली होती. मात्र 2014 साली स्व. मनोहर पर्रिकर यांना केंद्रात जावे लागल्याने हा प्रश्न प्रलंबीत राहीला. त्यानंतरच्या मुख्यमंत्र्यानी या निधीसंबंधी फारसा रस दाखविला नाही. मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनी पुन्हा आमदार निधीकडे लक्ष केंद्रीत केले. आणि सन् 2022-2023 मध्ये केवळ त्यांच्या सहकार्यामुळे हा आमदार निधी उपलब्ध होऊ शकला. वर्षाकाठी रु 2.50 कोटींचा हा निधी कसा वापरायचा यासंबंधी काही अटी असल्याने अनेकांसमोर प्रश्न होता. म्हणून अजून पर्यंत या निधीचा वापर अन्य मतदारसंघात होऊ शकलेला नाही. एकूण पाच वर्षात अंदाजे रु. 12 कोटींच्या आमदार निधीची तरतुद आहे. त्यानुसार मडकई मतदार संघात विकास कामांचे नियोजन करण्यात आले आहे. या पाच वर्षात आपण आमदार निधी व्यतिरिक्त अनेक कामांचे नियोजन केले आहे. सरकारच्या विविध खात्यांतर्फे मडकई मतदारसंघात विकासाचे शिल्प कोरले जाईल. त्यात मोलाची भर आमदार निधीतुन पडणार आहे. गतिमान विकासावर स्वार झालेल्या मडकई मतदारसंघात व जनतेच्या हितार्थ राबविलेली अनेक व विविध कामे पुर्णत्त्वास येणार आहेत. त्यामुळे जनतेचेही स्वप्न साकारले जाईल.
मतदारसंघात आजवर किती प्रमाणात पडीक शेती लागवडी खाली आली
तळावली येथे साधारण 25 वर्षे शेती लागवडीविना पडीक होती. कुटूंबण शेतकरी संघटनेतर्फे यंदा पहिल्यांदाच तळावली गावातील मुख्य पारंपारिक शेतजमीन प्रायोगिक तत्त्वावर काळ्या तांदळाचे पिक घेण्यात आले. पन्नासहुन अधिक शेतकऱ्यांना एकत्रीत आणून कुटूंबण शेतकरी संघटना स्थापन केली. या शेत जमीनी पैकी 3 हजार चौरस मिटर जमीन लागवडी खाली आणलेली आहे. तरुण पिढीला शेती व्यवसायाकडे वळवण्यासाठी आपले हे प्रयत्न आहे. त्यासाठी मतदार संघात अनेक भागात नांगरणी व बी पेरणीसाठी आधुनिक यंत्रे व कुशल कामगार उपलब्ध करुन दिले. मडकई, कुंडई, कवळे आदी भागातील सर्व पडीक शेती लागवडी खाली आणून त्यांना आवश्यक ती मदत केलेली आहे. या शिवाय शेतीसाठी असणाऱ्या बांधांची दुरुस्ती ही करण्यात आली आहे.
जनतेचे हीत आपण जपताना आणखीन कोण कोणती कामे हाती घेतलेली आहे
मलनिस्सारण प्रकल्प राबवताना देशातील ग्रामीण भागातला पहिला मलनिस्सारण प्रकल्प दुर्भाट या गावी राबवून मतदार संघाची मान व शान वाढवलेली आहे. न्हाणी घर व शौचालयाचे पाणी उघड्यावर सोडले जात होते. त्यामुळे जमिनीची सोशिकता संपुष्टात आली होती. म्हणून मलनिस्सारण प्रकल्प राबविले. कपिलेश्वरी, ढवळी व कवळेचा मलनिस्सारण प्रकल्प कार्यान्वीत झालेला आहे. उंडीर बांदिवडेचा मलनिस्सारण प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सोयीसाठी सुरु केला जाईल. बांदोडा येथील क्रिडापटूची मागणी लक्षात घेऊन स्व. भाऊसाहेब बांदोडकर मैदान विकसीत केले. जेष्ठ नागरिक व तरुणांची वाढती संख्या पाहुन या मैदानाला पुन्हा एकदा नव्या कामातून झळाळी देण्याचे निश्चीत केले. व त्यादृष्टीने दुरुस्ती, नवीन जॉग्रर्स पार्कची निर्मीतीचे काम ही हाती घेतलेले आहे. मडकई ग्रामपंचायतीचे मैदान विकासीत करण्याचे काम सुरु आहेत. विविधांगी सुविधांनी युक्त असलेल्या मैदानाला व्यायाम शाळा, विश्राम कक्ष, बॅटमींटन कोर्ट, चेंचींग रुम, समालोजनासाठी स्वतंत्र कक्ष या सर्व सुविधा पुरवील्या जाणार आहेत. लवकरच हा प्रकल्प लाकार्पण केला जाईल. याच धर्तीवर कवळे व आडपई येथील मैदाने उभारुन येथील खेळाडूंची सोय केली जाईल.
पावसात वारंवार होणाऱ्या खंडीत वीज प्रवाहावर काही उपाय योजना
पावसाळ्यात होण्याऱ्या पडझडीमुळे वीज प्रवाह सातत्याने खंडीत होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे. त्याचा विद्यार्थी वर्गा बरोबर सर्वांच त्रास सहन करावा लागत आहे. चोवीस तास अखंड वीज पुरवठा उपलब्ध करण्यासाठी 11 केव्ही व 33 केव्ही या कमी व उच्च दाबाच्या भुमीगत वीज वाहिनीची कामे सुरु आहेत. कवळे येथे सब स्टेशन बांधण्यासाठी 8 हजार चौसर मिटरची जागा सरकारच्या माध्यामातून घेतली जाइं&ल. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहे. लवकरच या प्रयत्नांना यश येणार आहे. कवळेचे सब स्टेशन उभारल्या नतंर फोंडा पालीका क्षेत्र, कवळे पंचायत, बांदोडा पंचायत वाडी तळावली, व आडपई क्षेत्रातला वीज प्रवाहात सुसुत्रता येणार आहे. जुन्या वाहिन्या बदलुन नवीन घातल्या जातील. नवीन ट्रान्स्फॉर्मर कार्यान्वीत करणे, सबस्टेशन उभारणे, सौर उर्जा प्रकल्पाची निर्मीती ही कामे पुर्ण झाल्यानंतर वीज प्रवाहात घडवून आणलेला बदल आणि वाहिनी विना पेटणारे पथदीप पाहिल्यानंतर मतदारसंघाची झळाळी शोभून दिसेल असा आशावाद वीज मंत्री ढवळीकर यांनी व्यक्त केला.









