सीरियल किलर महिलांचे क्रूर कृत्य : 4 जणांचा घेतला जीव
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
आंध्रप्रदेशच्या तेनाली येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील तीन ‘सीरियल किलर’ महिलांनी तीन महिलांसमवेत चार जणांची हत्या केली आहे. या महिला सर्वप्रथम अनोळखी लोकांशी मैत्री करायच्या. मग त्यांना सायनाइडयुक्त पेय प्यायला देत होत्या. यानंतर संबंदात लोकांच्या शरीरावरील सोने, रोख रक्कम आणि अन्य मूल्वायन सामग्री चोरत होत्या. आंध्रप्रदेश पोलिसांनी मुनगप्पा रजनी, मदियाला वेंकटेश्वरी आणि गुलरा रामनम्मा यांना अटक केली आहे.
सायनाइडयुक्त पेय प्यायल्यावर समोरचा व्यक्ती काही क्षणातच मृत्युमुखी पडत होता. मग या महिला चोरी करत होत्या. या हत्या जून महिन्यात झाल्या होत्या. या महिलांनी सर्वप्रथम नागुर बी नावाच्या एका महिलेची हत्या केली होती. या महिलांनी आणखी दोन जणांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून ते बचावले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मदियाला वेंकटेश्वरी ही महिला यापूर्वी अनेक गुन्ह्यांमध्ये सामील राहिली आहे. 32 वर्षीय मदियाला चार वर्षापर्यंत तेनालीमध्ये काम करत होती आणि नंतर कंबोडिया येथे गेली होती. तेथे ते अनेक सायबर गुन्ह्dयांमध्ये सामील होती. पोलिसांनी आरोपी महिलांकडून सायनाइड जप्त केले आहे. तसेच या महिलांना सायनाइड पुरविणाऱ्या इसमालाही पोलिसांनी अटक केली आहे.









