केरळमध्ये भारतातील पहिली संपूर्ण बाहुची (फुल आर्म) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया एका इराकी नागरिकावर करण्यात आली. त्याचे दोन्ही हात विजेच्या धक्क्मयामुळे निकामी झालेले होते. एका ब्रेनडेड महिलेचे हात त्याला बसविण्यात आले आहेत.
अंबिली असे या महिलेचे नाव आहे. कोच्ची येथील एका खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. हा रुग्ण 29 वर्षांचा असून हातांशिवाय त्याचे पुढचे संपूर्ण आयुष्य अडचणीचे ठरले असते. त्याला हे हात बसविण्यात आल्यानंतर हळूहळू हे हात कार्यरत होत आहेत. ते नैसर्गिक हातांसारखे काम करण्याची शक्मयता कमी असली तरी इतर अत्याधुनिक साधनसामग्रीच्या साहाय्याने रुग्ण या प्रत्यारोपित हातांचा उपयोग त्याची आवश्यक कामे करण्यासाठी करू शकेल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. या रुग्णाला आता डिस्चार्ज मिळाला असून तो आपल्या देशाला परत गेला आहे. त्याला दरवषी भारतात येऊन तपासणी करून घ्यावी लागणार आहे. या शस्त्रक्रियेमुळे त्याचा जणू पुनर्जन्मच झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. रुग्णालयाचे नाव अमृता हॉस्पिटल असे आहे. ही शस्त्रक्रिया जवळपास 12 तास चालली.
हातांचे दान करणारी महिला एका अपघातात ब्रेनडेड झालेली होती. ती पुन्हा कार्यरत होण्याची शक्मयता नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्या नातेवाईकांना हात दान करण्यासाठी तयार केले. त्यांनीही मान्यता दिल्यामुळे डॉक्टरांना हा प्रयोग करणे शक्मय झाले. हात दान करणारी ही महिला आता प्रशंसेचा विषय बनली आहे.









