कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
मनुष्यामध्ये माढणारे कर्करोगाचे प्रमाण ा ता शिगाजी धिापातील संशोधकांनी कर्करोग प्रतिबंधक औषधे तयार करण्यासाठी एका फळाची निगड करून संशोधन सुरू केले. मनस्पती आणि सूक्ष्मजीवापासून जैब सक्रिय संयुगे शोधून त्याचा कर्करोग प्रतिबंधक औषय निर्मितीसाठी उपयोग केला जात आहे. ही संधुगे कर्करोग कसा बरा करतात, हे पाहण्यासाठी विद्यापीठातील लॅबमध्ये उंदरांवर प्रयोग केला जात आहे. शिवाजी विद्यापीठातील जीवरसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. पद्मा दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरती कुलकर्णी व सुभर्णा उमापे पा संशोधक विद्यार्थिनी हे संशोधन करीत आहेत. उंदरावर प्रयोग करणारे शिवाजी विद्यापीठातील हे पहिलेच संशोधन आहे.
मनुष्याला होणारा कर्करोग बरा करण्यासाठी उंदरांवर प्रयोग करून त्यावर उपाययोजना काय केल्या पाहिजेत. पासंदर्मात जैव सक्रिय संयुगे बापरून अभ्यास केला जात आहे. कर्करोग तयार करणाऱ्या रसायनांचा डोस उंदरांना देवून कर्करोग तयार केला आहे. ज्यामुळे कर्करोग कसा तयार होतो आणि बाढतो हे पाहून अभ्यास केला जात आहे. माडलेला कर्करोग बरा करण्यासाठी वनस्पतीचा वापर करून कर्करोगप्रतिबंधक आयुर्वेदिक औषय निर्मिती करण्याचा संशोधकांचा मानस आहे. कर्करोगाच्या उपचारासाठी हे आयुर्वेदिक औषय घेतल्यामर इतर आजार निर्माण होतात की नाही पासाठी पहिल्यांदा उंदरांबर था औषधांचा प्रयोग केला जात आहे. जेणे करून या औषधांचे दुष्परिणाम उद्ममणार नाहीत. तसेच इतर सामान्य पेशींचे नुकसान होऊ नये म्हणून प्रयमन उंदरांवर चाचणी केली जात आहे.

त्यानंतर मनुष्यातील कर्करोग बरा करण्यासाठी औषय निर्मिती करण्याचा मानस आहे. भारतात पुरुषांना फुफुसाचा कर्करोग तर महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे. जीवरसायनशास्व अधिभिमागात पहिल्यांदा जैब सक्रिय संयुगाची प्रथमतः इनव्हिट्रो चाथणी केल्यानंतर सकारात्मक परिणाम दिसला. त्यानंतर लॅबमधील उंदरांबर प्रयोग सुरू केला. पामध्ये फुफुस आणि स्तनामध्ये होणारी कर्करोगाची गाठ उंदरांचा एक्सरे काढून तपासली. या कर्करोगाचा मनुष्याच्या शरीरात प्रसार होऊ नये यासाठी संशोषक औषय निर्मिती करणार आहेत.
- संशोधन मैलाचा दगड ठरू शकेल
शिवाजी विद्यापीठातील जीवरसायनशास्व मिमागातील पा संशोधनाचा भविष्यात कर्करोग बरा करण्यासाठी मैलाचा दगड ठरू शकेल. हे संशोधन करण्यासाठी कुलगुरु प्रकुलगुरू, कुलसचिव यांच्याकडून सर्वोपरी मदत केली जात आहे.
-डॉ. पद्मा बाबूलाल वांडगे (प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ)
भविष्यात मानवी उपचारात हस्तांतरित करण्याचा प्रयत्न उंबरांच्या प्रयोगशाळेत आयुर्वेदिक औषधांची चाचणी यशस्वी होताना दिसत आहे. त्यामुळे हे संशोधन फक्त प्रयोगशाळेत न राहता भविष्यामध्ये मानवी उपचारपद्धतीत हस्तांतरित करण्यासाठी संशोधक प्रयत्नशील आहेत. त्यासाठी आणखी काही कालावधी लागेल, असे संशोधकांचे म्हणने आहे.








