Satara Crime News : कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, निखिल आणि अभिजीत शिवाजी मोरे यांच्यावर वाई न्यायालय परिसरात गोळीबार करण्यात आला. ही घटना आज दुपारी घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. घटनेने परिसरात भिताचे वातावरण पसरले आहे.
वाई मेनवली येथील हॉटेल मालकास खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव आणि त्याच्या सहकाऱ्यावर वाई न्यायालयात गोळीबार झाला. दोन फायर होऊनही कोणाला दुखापत झाली नाही. घटनेची माहिती समजताच वाई पोलिसांची न्यायालयात धाव घेतली.