प्रतिनिधी/ बेळगाव
विजयादशर्मींच्या दिवशी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून सरकारी नोकर संघटनेच्या अध्यक्षावर एफआयआर दाखल झाला आहे.
बसवराज रायवगोळ, राहणार बसवन कुडची यांच्यावर मारिहाळ पोलीस स्थानकात भारतीय शस्त्रास्त्र कायदा 1959 च्या कलम 25(9) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विजयादशमीच्या दिवशी शिंदोळी येथील श्रीराम कॉलनीजवळ सायंकाळी 5 वाजता डबल बॅरेल बंदुकीतून हवेत गोळीबार करण्यात आला होता. यासंबंधीचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होताच पोलिसांनी सरकारतर्फे एफआयआर दाखल केला आहे. मारिहाळचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक हे पुढील तपास करीत आहेत.









