आरोपींचे पलायन, दोन युवक जखमी
वृत्तसंस्था/ लुधियाना
पंजाबमधील लुधियाना शहरात गोळीबाराची घटना घडली आहे. न्यायालय परिसरात मंगळवारी दोन गुंडांनी अन्य दोन युवकांवर गोळीबार केला आहे. गोळीबार केल्यावर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. या गोळीबारात 2 जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची ओळख पटली आहे. हा गोळीबार अमली पदार्थांच्या तस्करीवरून झालेल्या वादातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला वेग दिला आहे. गोळीबार करणाऱया आरोपींची धरपकड करण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे.









