विजयवाडा : आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे फटक्यांच्या दुकानाला आग लागली. या भीषण आगीत २ जणांचा होरपळून मृत्यू झाला. विजयवाडा येथिल गांधी नगर परिसरात ही घटना घडली आहे. विजयवाडा येथे राहणारे काशी आणि पिदुगुरल्लाचे रहिवाशी असलेले सांबा हे मृत्यमुखी पडले आहेत. स्टॉलच्या आत ते झोपले असताना आग लागली होती. या बाजारपेठेतील ३ दुकाने जळून खाक झाली आहेत.
घटनास्थळावरील फटाक्यांचे स्टॉल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून या आगीत फटाके फुटण्याचा जोरात आवाजही नागरिकांना येत होता. विजयवाडा पोलिस आयुक्त कांती राणा यांनी सांगितले की, “सर्व दुकानदारांना सुरक्षिततेच्या परवानग्या दिल्या आहेत. फटाके देशी बनावटीचे असल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी, खरे कारण शोधले जात आहे,” असे अधिकृत आयुक्तांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. “सर्व दुकानांमधील आग अग्निशामक कर्मचार्यांची विझवण्यात आली असून. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाकवल्याने पुढील मोठी हानी टळली,” स्थानिक आमदार मल्लादी विष्णू यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









