रस्त्यावरील अतिक्रमणामुळे अग्निशामक दलाचे बंब अडकले : मुख्याधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई न केल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप
म्हापसा : म्हापसा बाजारपेठेतील हॉटेल सदानंद समोरील जीएम टेक्सटाईल्सच्यावर असलेल्या वायर्सला शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत केबलचा बंच पूर्णत: जळून खाक झाला. हॉटेल सदानंदच्या मालकाने धूर येत असल्याचे पाहून दुकानदारांना तसेच अग्निशामक दलाला माहिती दिली. म्हापसा अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी येण्यासाठी निघाले मात्र बाजारपेठेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसलेल्या फळविक्रेत्यांमुळे व दुचाकी पार्किंगमुळे त्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशिर झाला. तोपर्यंत लोकांनी वातानुकूलित मशिनचा वीज पुरवठा बंद केल्याने आग पुढे पसरली नाही मात्र यामुळे बाजारपेठेतील रस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा पुढे आला आहे.
म्हापसा अग्निशामक दलाला दुपारी 4 वा. म्हापसा बाजारपेठेत सदानंद हॉटेलसमोरील दुकानाच्या छतावऊन धूर येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अधिकारी कृष्णा पर्रीकर, उपअधिकारी अशोक परब आपल्या पथकासमवेत बंब घेऊन बाजारपेठेत आले मात्र साळगावकर फार्मसीसमोरील लाईनमध्ये बसलेल्या फळविक्रेत्यांमुळे त्यांना पुढे जाण्यास अडथळा झाला. त्याचबरोबर रस्त्याच्या मधोमधे दुचाक्याही पार्क केलेल्या असल्यामुळे बंब नेण्यास अडचण निर्माण झाली. शेवटी फळविक्रेत्यांनी आपले सामान उचलल्यानंतर व दुचाक्या बाजूला केल्यावर अग्निशामक बंब पुढे जाऊ शकले. बाजारातील या दुकानात दोन वातानुकूलित असून लोड आल्याने वायर्सनी पेट घेतला असावा अशी माहिती काम पाहणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांनी दिली. या आगीत 75 मीटरचा संपूर्ण केबल जळाला. घटनेची माहिती मिळताच व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत, सदस्य फळारी, म्हापसा मार्केट निरीक्षक नरसिंह राटवळ आदींनी घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली.
आठ दिवसांपूर्वीच बाजारपेठेची पाहणी
म्हापसा पालिका, अग्निशामक दल व व्यापारी संघटनेची संयुक्त बैठक होऊन आपत्कालीन घटनेसंदर्भात बाजारपेठेची पाहणी करण्यात आली होती. त्यात बाजारपेठेत 5 मीटर रस्ता खुला ठेवण्याबाबत ठरले होते मात्र मुख्याधिकाऱ्यांनी अजूनही त्याबाबत कोणतीच कारवाई केलेली नाही. आज आग मोठी असती तर काय झाले असते? त्याला जबाबदारी कोणी घेतली असती? असे प्रश्न कऊन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत यांनी बाजारपेठेत शिस्त आणण्याची गरज व्यक्त केली.
दलाच्या जवानांनी फळविक्रेत्यांचे सामान केले बाजूला
अग्निशामक दलाचे बंब बाजारपेठेत येताना रस्त्यावर बसलेल्या फळविक्रेत्यांनी त्यांचा रस्ता अडवला तसेच रस्त्याच्या दुहेरी व मधोमध लावलेल्या दुचाक्यांमुळे अडचण झाली. शेवटी जवानांनी खाली उतऊन फळविक्रेत्यांचे सामान बाजूला केले तसेच दुचाक्याही बाजूला कऊन घटनास्थळी पोहोचले.









