कापड दुकानातील आगीवर 30 तासांनी नियंत्रण : 800 राजस्थानी व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका
सुरत :
गुजरातमधील सुरत शहरात कापड बाजारात रिंग रोडवरील शिवशक्ती टेक्स्टाईल मार्केटमध्ये लागलेल्या आगीत 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मंगळवारी बाजारपेठेत आग लागली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी 7 वाजता पुन्हा आग लागल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. सुमारे 30 तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. यादरम्यान, जवळपास निम्मी दुकाने जळून खाक झाली. सुदैवाने या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी राजस्थानी व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.









