ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याच्या कोंढवा परिसरातील गंगाधाम सोसायटी जवळच्या एका गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली. क्षणार्धात आगीने उग्ररुप धारण केल्याने आग भोवतालच्या तीन एकर परिसरात पसरली. या आगीत गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील गंगाधाम सोसायटीच्या जवळच्या एका गोदामाला आज सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. आगाची माहिती मिळताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला यासंदर्भात माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी दाखल होईपर्यंत आगीने उग्ररुप धारण केले. धुराचे लोट परिसरात दूरवर पसरले आहेत. त्यामुळे आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला अडथळे येत आहेत. आग परिसरातील तीन एकरात पसरली असून, परिसरातील काही इमारती रिकाम्या करण्याचा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलाच्या 20 गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.








