वार्ताहर कुडाळ
कुडाळ सत्कार हॉटेल येथील सिद्धिविनायक अपार्टमेंटमधील इमारतीतील पहिल्या मजल्यावरीलफ्लॅटमधील गिझरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे व भाडेकरूच्या निष्काळजी पणामुळे आग लागली. सुदैवाने फ्लॅटमध्ये कोणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या इमारतीमधील रहीवाशांनी व कुडाळ एम. आय. डी. सी. येथील अग्निशमन दलाला पाचारण करून ही आग आटोक्यात आण्यात यश आले. मात्र या आगीत फ्लॅटचे आणि फ्लॅट मधील सामानाचे किरकोळ नुकसान झाले. ही घटना रविवारी सकाळी 10 च्या सुमारास घडली.
कुडाळ सिद्धिविनायक अपार्टमेंटमधील इमारतीत लोकांची मोठी वस्ती आहे. या इमारतीत महिला मदिना शाबुद्दीन बागवान या कित्येक महीने भाडेकरु म्हणून राहत होत्या. आज सकाळी त्या बाथरूम मधील गिझरचे बटन सुरु ठेवून विसरून मार्केटला गेल्या होत्या. यावेळी इमारतीत राहणाऱ्या लोकांना मदिना बागवान यांच्या रुमध्ये कसलातरी मोठा आवाज झाला. त्यांच्या रूममधून आगीचा धूर येऊ लागला. यावेळी आजूबाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांनी ताबडतोब अग्निशमन दलाशी संपर्क साधला. अग्निशमन दल लागलीच घटना स्थळी दाखल झाले. अग्निशमन दल व तेथील रहीवाशांनी रूमधील सिलेंडर, शेगडी असे ज्वलनशील पदार्थ ताबडतोब घराबाहेर काढले. त्यामुळे संभाव्य धोका टळला. नाहीतर मोठा अनर्थ झाला असता. परंतु या आगीमुळे फ्लॅटचे आणि फ्लॅट मधील सामानाचे किरकोळ नुकसान झाले आहे. यावेळी सुवर्णा सामंत, रामकुमार करीझा, प्रदीप यादव, अमित मार्गी, मयुर धुरी, प्रतीक दळवी, प्रणोती तळेकर, राजन तुपत आदी नागरीकांच्या व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही आग विझविण्यात यश आले.









