सांगली :
शनिवारी मध्यरात्री कोल्हापूर रोडवरील वर्धमान प्लाझा मागे अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने ही आग आटोक्यात आणली.
वर्धमान प्लाझा मागील सय्यद यांच्या घरी कुलर शॉर्ट होऊन आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर आग फ्लॅटच्या बेडरूम मध्ये लागली. आगीमध्ये घरातील साहित्य, फर्निचर, कपाट, कपडे इत्यादी साहित्य जळाले. सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. आग लागल्याची वर्दी शेजाऱ्याने अग्निशमन केंद्रास दिली. फ्लॅटधारकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. परंतु आगीच्या ज्वाला व धूर असल्यामुळे नागरिकांना आग आटोक्यात आणणे अडचणीचे ठरत होते.
अग्निशमन दलाने तत्काळ आग आटोक्यात आणल्याने दुसऱ्या खोल्यात आग पसरली नाही. यावेळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या सहाय्याने मुख्य अग्निशमन अधिकारी सुनिल माळी, दत्तात्रय माने, अक्षय माने, अजित सावंत, सुरेश आलगुर, रोहित म्हस्के, कृष्णराव मोरे, अभिजित पाटील यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.








