अग्निशामक दलाची क्षमता वाढणार
पुणे
सध्या मोठमोठ्या शहरात आगीच्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. अशातच अग्निशामक दल आपले काम चोख बजावतात. अशातच आता त्यांची क्षमता वाढणार आहे. अग्निशामक दलाची १६ व्या मजल्यापर्यंत पाणी मारू शकतील अशी क्षमता वाढणार आहे.
शहरात रोज आग लागल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत असतात, अग्निशामक दलावर कामाचा ताण येत आहे. अग्निशामक दल्याची १७ वाहने सेवेतून आयुर्मान संपल्यामुळे बाहेर काढण्यात आली आहेत. त्यामुळे सध्या अग्निशामक दलात २२ बंब आणि ५ टॅंकर सेवेत आहेत. नवीन वाहने खरेदी करण्यासाठी २४ कोटी रुपयांचा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती समोर सादर केला आहे. मोठ्यामोठ्या शहरात इमारतीही उंच असतात. यामध्ये उंच इमारतींना आग लागल्यस १५ ते १६ मजल्यापर्यंत पाणी मारता येईल अशा क्षमतेचे पाच बंबं घेतले जाणार आहेत.








