वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीतील अंगद विहार भागानजीक एका रुग्णालयाला भीषण आग लागली असून या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही आग शनिवारी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी लागली, अशी माहिती देण्यात आली आहे. या दुर्घटनेची माहिती कळताच त्वरित आपत्कालीन साहाय्यता यंत्रणेला पाचारण करण्यात आले असून आग विझविण्यासाठी प्रयत्नांना प्रारंभ करण्यात आला. संध्याकाळपर्यंत आगीवर नियंत्रण आणण्यात आले. मृत व्यक्ती रुग्णालयाचा कर्मचारी असल्याचे समजते. आग लागल्यानंतर काही काळ या भागात वाहतुकीवर स्थगिती देण्यात आली होती. आता स्थिती नियंत्रणात असून वाहतूक पूर्ववत झाली आहे. या रुग्णालयाचे नाव कॉसमॉस सुपरस्पेशालिटी रुग्णालय असे आहे.









