सातारा :
सातारा शहरापासून जवळच असलेल्या एमआयडीसी परिसरातील कोडोली येथील धनगरवाडी येथे सर्जेराव खरात यांच्या गवताच्या गंजीला आग लागल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला होता. यांची गवताची गंज ही गावाच्या बाहेर असल्याने ग्रामस्थांना आगीची घटना उशिरा कळली. मात्र, अग्निशामक दलास माहिती मिळताच अग्निशामक दल तेथे तत्काळ पोहोचले. तसेच गणेश चौकात एका कुरिअर कंपनीच्या ऑफिसला शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना घडली होती. तसेच सोमवारी दुपारी अंजठा चौकापासून काही अंतरावर हॉटेल प्रितीच्या पाठीमागे एका दुकानाला आग लागली होती. या तिन्ही आगी तारांबळ झाली असली तरी सातारा पालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकाने आटोक्यात आणल्या.
धनगरवाडी येथे सर्जेराव खरात यांचे जनावरांचे शेड व त्यांची गवताची गंज ही गावाच्या बाहेर आहे. त्यांच्या गवताच्या गंजीला रविवारी रात्री अचानक आग लागल्याचे समजताच खरात कुटुंबियांना समजताच त्यांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. गुरांना वाचवण्यात आले. त्यांनी अग्निशामक दलाला फोन करुन माहिती कळवली. तोपर्यंत गवताने पेट घेवुन नुकसान झाले. अग्निशामक दलाच्यावतीने आग आटोक्यात आणली गेली. अग्निशामक दलाचा बंब अग्मिशामक दलाच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर त्यांना गणेश चौक परिसरातल्या एका कुरिअर कंपनीच्या ऑफिसमध्ये आग लागल्याचा फोन आला. क्षणात लगेच अग्निशामक दलाची गाडी तेथे पोहोचले. आगीने रौद्र रुप धारण करण्यापुर्वी ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. काही कागदपत्रे जळाली.
सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अंजठा चौकापासून काही अंतरावर हॉटेल प्रितीच्या पाठीमागे असलेल्या एका दुकानाला आग लागाल्यची घटना घडली होती. या आगीची माहिती स्थानिकांनी अग्निशामक दलाला देताच तेथे अग्निशामक दलाचे पथक पोहचले. वेळीच अग्निशामक दलाचे बंब पोहोचल्याने मालाचे नुकसान झाले नाही. शिवाय कोणतीही जिवितहानी झाली नाही. एकाच परिसरात आगीच्या तीन घटना घडल्या. यामध्ये धनगरवाडीत शेतकऱ्याच्या गवताच्या गंजीचे नुकसान झाले असून इतर दोन ठिकाणी मात्र किरकोळ नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
- अग्निशामक दलाची सर्तकता
अग्निशामक दलास नागरिकांनी फोनवरुन आगीची कल्पना देताच डायरित नोंद करुन लगेच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी पोहोचल्याने होणारे नुकसान टळले. अग्निशामक दलाकडून दाखवलेल्या सर्तकतेमुळे त्यांचे कौतुक होत आहे.








