Fire at Bandekar Brothers’ furnace
चराठा गावठाणवाडी येथे लाडू फारसाण बनवण्याच्या बांदेकर ब्रदर्स भट्टीतील तेलाच्या कडईला अचानक आग लागून उडालेल्या आगीच्या भडक्यात भट्टीसह इमारत भस्मसात झाली. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही मात्र या घटनेत सुमारे पावणे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. बांदेकर ब्रदर्सच्या मालक राधिका बाळकृष्ण बांदेकर यांच्या नवऱ्याचे दीड वर्षांपूर्वी कोरोनामुळे पतीचे निधन झाले होते. या धक्क्यातून सावरत त्यांनी आत्ताच या व्यवसायात जम बसवायला सुरुवात केली होती. त्यामुळे या घटनेमुळे त्यांना पाठोपाठ धक्काच बसला आहे.
सावंतवाडी/ प्रतिनिधी-