बीजिंग
चीनमध्ये एका कंपनीच्या प्रकल्पात आग लागल्याने 38 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले असून दोघे बेपत्ता आहेत. तपास यंत्रणांनी या आगीमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. मध्य चीनमधील हेनान प्रांतात ही दुर्घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन यंत्रणा, सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्कालीन वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले होते. स्थानिक सार्वजनिक सुरक्षा विभागाने संशयितांना ताब्यात घेतले आहे.









