आपत्कालीन वॉर्ड बंद : सुदैवाने जीवितहानी टळली
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राजधानीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (एम्स) सोमवारी आगीची दुर्घटना घडली. अग्निशमन दलाने जवळपास तासभर केलेल्या अथक परिश्रमानंतर आग नियंत्रणात आली. मात्र, इस्पितळ परिसरात पसरलेल्या धुरामुळे वैद्यकीय सेवांवर परिणाम झाला. रुग्णालयातील एन्डोस्कोपी विभागात लागलेल्या भीषण आगीनंतर आपत्कालीन वॉर्ड अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत येणाऱ्या ऊग्णांना जवळच्या सफदरजंग ऊग्णालयात जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी 11.55 च्या सुमारास एम्स ऊग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. अथक परिश्र्रमानंतर एम्स इमारतीतील आग आटोक्मयात आणण्यात आली.
आगीत आपत्कालीन विभागाचे सर्वाधिक नुकसान झाल्यामुळे हा वॉर्ड पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे. एन्डोस्कोपी विभागात लागलेली आग एवढी भीषण होती की त्याचे धुराचे लोट वर उठताना दिसत होते. आगीची माहिती मिळताच ऊग्णांना तातडीने वॉर्डातून बाहेर काढण्यात आले. तथापि, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. एम्स ऊग्णालयातील आपत्कालीन विभागाशिवाय इतर सर्व सेवा पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू राहणार आहेत.









