बेंगळूर : मंड्या जिल्ह्यातील मद्दूर येथे गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवेळी प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून भाजपचे विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांच्याविरोधात गुरुवारी एफआयआर दाखल करण्यात आला होता. आता याच कारणावरून भाजपमधून हकालपट्टी झालेले आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्याविरुद्ध देखील एफआयआर दाखल झाला आहे. मद्दूरमध्ये बुधवारी गणेशमूर्तींचे सामूहिक विसर्जन करण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी त्यांनी मद्दूरला भेट दिली होती. त्यावेळी चाहत्यांना संबोधून बोलताना त्यांनी एका समुदायाच्या विरोधात वक्तव्ये केली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मद्दूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे.
Next Article लोकप्रियता सहन होत नसल्याने भाजपकडून अपप्रचार!
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









