खाल्ल्यावर बोटं धुण्याची नाही गरज
स्नॅक्सचा विचार मनात आल्यावर सर्वप्रथम मसालेदार चिप्सचे नाव समोर येते. कुठे प्रवासाला जात असो किंवा ट्रिपवर बॅगेत चिप्सचे पाकिट असते. याचमुळे काही विशेष ब्रँड्सचे चिप्स जगभरात लोकांच्या पसंतीचे असतात. अशाच चिप्सप्रेमीसाठी एक मजेशीर बातमी समोर आली आहे. चिप्स खाण्याच्या शौकिनांना कुठेही पाकिट फोडून ते खाण्याचा मोह होतो. परंतु त्यानंतर बोटांवर लागलेले तेल-मीठ कसे घालवावे असा विचार पडतो. अशा स्थितीत एक विशेष यंत्र तयार करण्यात आले आहे. हे यंत्र आळशी लोकांचे सोफ्यावर बसल्या-बसल्या हात साफ करण्याचे स्वप्न साकार करणार आहे. चिप्स खाल्ल्यावर बोटं साफ होतील आणि तुम्हाला बसल्या जागेवरून उठावे लागेल.

सर्वसाधारणपणे चिप्स खाल्यावर हातात नॅपकिन किंवा रुमाल घेऊन हात साफ केला जातो. परंतु त्यात मसाला अधिक असल्यास त्वरित हात धुणेच योग्य असते. परंतु काही लोकांना उठून हात धुण्यास नको वाटते. अशाच लोकांसाठी एक विशेष यंत्र तयार करण्यात आले आहे. चिप्स तयार करणाऱया कंपनीकडूनच हे अजब यंत्र तयार करण्यात आले आहे. हे यंत्र पाहण्यास एखाद्या छोटय़ा वॉशिंग मशीनसारखे दिसते. यात तेल आणि मसाले लागलेले बोट ठेवून साफ करता येते.
कसे करते काम?
या यंत्रावर ऑन आणि ऑफ बटनद्वारे ती वापरता येत. बोट मशीनमध्ये ठेवल्यावर ते एखाद्या जादूप्रमाणे साफ करते. यात एक इंडक्टशन सिस्टीमचा वापर करण्यात आला असून यामुळे ऑटोमॅटिक अल्कोहोल स्प्रेद्वारे फिंगरटिप्स साफ होतात. एक रिफिल करण्यात येणाऱया टँकद्वारे हा अल्कोहोल खाली येतो, जो वॉशिंग मशीनच्या खालील भागात बसविण्यात आला आहे. यंत्राची लांबी 15 सेंटीमीटर तर रुंदी 11 सेंटीमीटर आहे. यात एक युएसबी पोर्ट असून तो टाइप सी चार्जरने चार्ज होते. जपानच्या सोशल मीडियावर हे यंत्र विशेष लक्ष वेधून घेत आहे.









