वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथील दिल्ली लॅन टेनिस संघटनेच्या संकुलात 30 वी फिनेस्टा खुली राष्ट्रीय हार्डकोर्ट टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा सोमवार दि. 29 सप्टेंबरपासून खेळविली जाणार आहे. या स्पर्धेत देशातील अव्वल टेनिसपटू सहभागी होत आहेत. या स्पर्धेतील माजी विजेते विष्णू वर्धन आणि व्ही. एम. रणजीत पुन्हा जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत. 27 सप्टेंबरपासून पुरुष आणि महिलांच्या पात्र फेरी सामने खेळविले जातील वरीष्ठ गटातील सामने संपल्यानंतर 14, 16, 18 वर्षाखालील वयोगटात ही स्पर्धा घेतली जाणार आहे.









