वार्ताहर /काकती
हिंडाल्को इंडस्ट्रीजने पाच गरीब विद्यार्थिनींना तीन वर्षाचे डिप्लोमा शिक्षण घेण्यासाठी मदत केली असून शिक्षणासाठी आर्थिकदृष्ट्या मदतीचा हात पुढे केला आहे. कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमाचा एक भाग म्हणून मुलींच्या शिक्षणावर प्रमुख भर दिला आहे. मुलींना उच्च शिक्षणासाठी आधार देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मुलींनी संधीचे सोने करावे, असे आवाहन हिंडाल्कोचे अध्यक्ष सौरभ खेडेकर यांनी केले.
हिंडाल्को इंडस्ट्रीज बेळगाव यांच्यावतीने गरीब विद्यार्थिनींना डिप्लोमा शिक्षणासाठी मदत देण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. हिंडाल्कोचे युनिट हेड अभिजित बंडी यांनी समाजातील दुर्बल घटकाचा विकास करण्यासाठी पुढाकार घेणे ही सामाजिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केले. तर कंपनीचे प्रमुख मानव संसाधन अधिकारी मयुर कृष्णा यांनी विचार व्यक्त केले. यावेळी सिनिअर मॅनेजर सीएसआर दिनेश नाईक, माजी महापौर बसाप्पा चिकलदिनी, मुत्तेनट्टी ग्रामविकास समितीचे कन्नाप्पा जांभळे, कणबर्गी ग्रामविकास समितीचे मनु मुतगेकर उपस्थित होते. स्वागत राकेश नाईक यांनी तर मंजुनाथ मास्तर यांनी आभार मानले.