सावंतवाडी : प्रतिनिधी
प्रतिवर्षीप्रमाणे काल सावंतवाडी येथील डॉ . परूळेकर नर्सिंग होम येथे जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे आर्थिक मदत करण्यात आली.बांदा येथील मेंदू कर्करोगग्रस्त प्रसाद बांदेकर,मानेच्या मणक्याची शस्त्रक्रिया झालेल्या आणि अपंगत्व आलेले बांदा येथील विनय सावंत, मुळदे येथील अर्धांगवायू झालेले संजय गवई,कास येथील ह्रदय शस्त्रक्रिया झालेले प्रकाश मिस्त्री आणि असनीये येथील मधुमेह आणि रक्तदाब ग्रस्त अनिल सावंत अशा पाच लाभार्थी रुग्णांना डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.त्यावेळी असनिये येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत उपस्थित होते.
Previous Articleमोठ्या प्रमाणात खर्च; मात्र तपशील नाहीच!
Next Article काकतीत भरवस्तीत साडेतीन लाखाची घरफोडी









