गरजू तरुणीला धनादेश वितरित करताना.
बेळगाव :
शहापूर येथील दिव्यांग मुलीला बबन भोबे मित्रमंडळाच्या माध्यमातून शारीरिक अपंग संस्था शहापूर यांच्यावतीने नुकतीच आर्थिक मदत करण्यात आली. या मुलीने शिक्षण पूर्ण केले असून सध्या ती नोकरीच्या शोधात आहे. तिला महानगरपालिकेतर्फे तीनचाकी वाहन देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. संजीवनी कदम या तरुणीने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन बबन भोबे व शहापूर येथील अपंग संस्थेच्यावतीने संस्थेचे सेक्रेटरी गिरीश सव्वाशेरी यांच्या हस्ते तिला धनादेश देण्यात आला. यावेळी बबन भोबे, आय. के. मंडोळकर, शारीरिक अपंग संस्थेचे अध्यक्ष वामन कट्टी, दयानंद द•ाrकर, मंदा नेवगी, सुरेश कागवाड, मल्लेश चौगुले आदी उपस्थित होते.









