मळेवाड नाभिक पंचक्रोशी संघटनेचा पुढाकार
न्हावेली / वार्ताहर
काही दिवसापूर्वी मळेवाड कोंडूरे येथील बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेले कोंडूरा येथील आनंद न्हावी यांची संत सेना मळेवाड पंचक्रोशी नाभिक संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन विचारपुस केली व संघटनेकडून आर्थिक मदत करत त्यांना धीर देण्यात आला. यावेळी मळेवाड पंचक्रोशीतील संत सेना नाभिक संघटनेचे पदाधिकारी अजय तळवणेकर,सुनील न्हावेलकर,आनंद न्हावेलकर,संदेश आरोसकर,नंदकिशोर चव्हाण,सखाराम चव्हाण, नवनाथ तिरोडकर उपस्थित होते.









