वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले उभादांडा नवाबाग किनाऱ्यावरुन रापण मच्छीमारी करणाऱ्या उभादांडा-सुखटनवाडी येथील व्हाँलीक्राँस रापण संघाचे नैसर्गिक दृष्ट्या झालेल्या नुकसानीची माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व वृत्तपत्रातून मिळाताच शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी तात्काळ 25 हजार रोख रुपयांची मदत रापण संघास शिवसेना पदाधिकारी यांचे मार्फत सुपुर्द केली.वेंगुर्ले उभादांडा नवाबाग किनाऱ्यावरुन रापण मच्छीमारी करणाऱ्या उभादांडा-सुखटनवाडी येथील व्हाँलीक्राँस रापण संघाच्या रापणीचे शनिवार दि. 26 आँगस्ट रोजी अकस्मित वादळी वाऱ्याने जाळी तुटून हा मोठे नुकसान झाले होते. याची माहिती या भागाचे आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना मिळताच त्यांनी तात्काळ वेंगुर्लेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना केलेल्या सुचनेनुसार वेंगुर्ला तालुका शिवसेना प्रमुख नितीन मांजरेकर व शहर शिवसेना प्रमुख उमेश येरम यांनी नवाबाग येथे रापण संघाच्या व्यवस्थापक व मालकांची भेट घेत 25 हजार रुपयांची तातडीची मदत प्रदान केली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुनील मोरजकर, सामाजिक कार्यकर्ते कार्मीस आल्मेडा, तसेच रापण संघाचे मालक रुजाय फर्नाडिस व घाब्रीयल ब्रिटो तसेच रापणीतील मच्छीमार सदस्य उपस्थित होते. या मदतीबाबत व्हाँलीक्राँस रापण संघाच्या मालक व मच्छीमार यांनी दिपक केसरकर यांचे तसेच शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम यांचे आभार व्यक्त केले.
दरम्यान, वेंगुर्ले तालुक्याच्या किनाऱ्यावर मच्छीमारी करण्याऱ्या मच्छीमारांच्या अडचणी व संकटात सर्वप्रथम सहकार्य व मदत करण्याच्या दिपक केसरकर यांच्या या निस्वार्थी व माणुसकीचा स्वभावाचे यावर्षीच्या मच्छी हंगामात मच्छीमारांना अनुभव आला.









