दुसऱया देशांना पाठवत होता गोपनीय माहिती
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हेरगिरीच्या आरोपाप्रकरणी अर्थ मंत्रालयातील एका कर्मचाऱयाला अटक करण्यात आली आहे. संबंधित कर्मचारी पैशांच्या आमिषापोटी इतर देशांना अर्थ मंत्रालयाशी निगडित गोपनीय माहिती पुरवत होता. आरोपीचे नाव सुमित असून तो अर्थ मंत्रालयात कंत्राटी स्वरुपात कार्यरत होता. आरोपीने अत्यंत संवेदनशील माहिती इतर देशांना पुरविल्याचे समोर आले आहे.
सुमितकडून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनुसार आरोपी याच मोबाईलचा वापर करत हेरगिरी करत होता. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयाशी संबंधित घटना असल्याने पोलीस विस्तृत चौकशीनंतरच प्रसारमाध्यमांना माहिती देणार आहेत.









