नवी दिल्ली:
2023 सालातील केंद्रीय अर्थसंकल्प हा शाश्वत भविष्यासाठी असून 2047 ची स्वप्ने साकार करण्यासाठी या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाची क्षमता अधोरेखित केली आहे त्यामुळे हरित ऊर्जा आणि पायाभूत सुविधांमुळे नविन रोजगारांना प्रोत्साहन मिळेल. या अर्थसंकल्पात सरकारने तंत्रज्ञानावर भर दिला असून शाश्वत भविष्यासाठी आणि हरित ऊर्जा, हरित विकास, हरित पायाभूत सुविधा आणि हरित रोजगारांना प्रोत्साहन ठरणारा असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. त्यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले. “आम्ही अर्थसंकल्पात तंत्रज्ञान आणि एका नव्या अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले आहे.
नवीनतम कर सवलतींचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की, या नव्या करांमुळे मध्यमवर्गाला दिलासा मिळाला आहे. मध्यमवर्गाची क्षमता अधोरेखित केली गेल्याने 2047 ची स्वप्ने साकार करण्यास मदत होणार आहे.
आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, “भारताचा मध्यमवर्ग हा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात एक मुख्य प्रवाह राहिला आहे. समृद्ध आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मध्यमवर्ग ही एक मोठी शक्ती आहे. आमच्या सरकारने मध्यमवर्गाच्या सक्षमीकरणासाठी आणि जीवन सुलभ करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. आम्ही करांचा दर कमी केला असल्याने हा दिलासा मिळाला आहे,”