कोल्हापूर :
शहरातील राजाराम रायफल ते दिघे हॉस्पीटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याला चार जणाच्या टोळक्याने अडविले. त्याला राजेंद्रनगरात नेवून लाथाबुक्क्याने बेदम मारहाण कऊन, त्याच्याकडील 3 लाख 61 हजार 377 ऊपयांची रोकडीसह 10 हजार ऊपये किंमतीचा मोबाईल हॅण्डसेट आणि 2 हजार ऊपयांचे बायोमॅटीक मशीन असा 3 लाख 73 हजार 377 ऊपये किंमतीचा ऐवज हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणक्ष राजारामपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याची फिर्याद आकाश जगन्नाथ शिंदे (वय 26, रा. माले, ता. हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी आकाश शिंदे एका फायनान्स कंपनीत वसुली अधिकारी म्हणून काम करतो. त्यांच्याकडे महिला बचत गटानी दिलेल्या कर्जाच्या हप्ताची वसुली केलेली 3 लाख 61 हजार 377 रुपयांची रोकड दुचाकीवऊन घेवून, शहरातील कदमवाडी रोडवरील हॉटेल लिशा येथील भारत फायनान्स कंपनीत भरण्यासाठी गुरुवारी रात्री राजाराम रायफल ते दिघे हॉस्पीटलकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन येत असतात त्याच्या पाठीमागून दुचाकीवरून चार जणांच्या टोळके आले.
त्यांनी त्याच्या दुचाकीच्या आडवी आपली मोपेड उभी करून थांबविले. त्यानंतर त्याला राजेंद्रनगर येथे आणले. या ठिकाणी या टोळक्याने तु राजेंद्रनगरात येऊन दादागिरी करतोस काय, असे विचारत त्याला लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. मारहाणीदरम्यान दोघानी त्यांच्याकडील रोख रक्कम असलेली बँग जबरदस्तीने हिसकावून घेऊन पलायन केले. तसेच मारहाण करणारे अन्य दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. याबाबतचा गुरुवारी रात्री उशिरा राजारामपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे.








