विटा प्रतिनिधी
लाचलुचपत प्रकरणाने चर्चेत आलेले विटा पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. याबाबत ७ जून रोजी नगर विकास खात्याने जारी करण्यात आलेल्या आदेशातून ही गोष्ट समोर आली आहे.
विटा शहरातील एका बांधकाम व्यवसायिकाकडे इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी विट्याचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक आणि मुख्याधिकारी औंधकर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अडीच लाख रुपयांच्या ऐवजी तडजोडी अंती दोन लाख रूपये लाचेची मागणी केल्याचे लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात स्पष्ट झाले. त्यानंतर १६ मे रोजी प्रत्यक्ष मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने सापळ्यात पकडले होते. तसेच विटा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात विनायक औंधकर यांना १७ मे रोजी अटक करण्यात आली होती. तेंव्हापासून २० मे पर्यंत म्हणजे सुमारे ४ दिवस म्हणजे ४८ तासां पेक्षा अधिक इतक्या कालावधीकरिता ते पोलीस कोठडीत होते. त्यानंतर नागरी विकास खात्याने ७ जून रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, विनायक औधकर हे पोलीस कोठडीत स्थानबद्ध दिनांकापासून म्हणजे १७ मे पासून निलंबित झाल्याचे मानण्यात आले आहे (मानीय निलंबन) आणि ते पुढील आदेश काढले जाई पर्यंत निलंबित राहतील.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








