शाहुवाडी प्रतिनिधी
इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओला लाईक केले प्रकरणी उचत पैकी लहीन येतील सोहेल टिपू सुलतान मालदार या युवकाला शाहूवाडी तालुक्यातून हद्दपार केले असल्याची माहिती शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली .उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांनी हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर केला.
पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार सोहेल टिपू सुलतान मालदार यांने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओला लाईक केले होते . याबाबत त्याच्यावर शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद झाला होता . सदर घटनेने मलकापूर शहरात तणावाचे वातावरण पसरले होते . या घटनेबाबत हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सदर युवकावर कारवाई करावी याबाबत निवेदन देण्यात आले होते .
सदर युवकावर यापूर्वी देखील अशा स्वरूपाचा गुन्हा नोंद झाला आहे. हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या जातील अशा स्वरूपाच्या इंस्टाग्राम वरील पोस्टला सोहेल मालदार यांने लाईक केल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याबाबत पोलीस उपअधीक्षक यांनी हदपारी बाबतचा प्रस्ताव शाहूवाडी पन्हाळा उपविभागीय तथा दंडाधिकारी यांच्याकडे सादर केला होता .यानुसार उपविभागीय तथा दंडाधिकारी शाहुवाडी पन्हाळा यांनी सोहेल टिपू सुलतान मालदार यास शाहूवाडी तालुक्यातून 14 जून2023 पासून हद्दपार केले असल्याची माहिती शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली.
दरम्यान यापुढेही तालुक्यात शांतता व सलोखा कायम राहावा .कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याबाबत सर्वांनीच सतर्कता घेण्याबरोबरच . हिंदू मुस्लिम बांधवांनी शांततेचे सहकार्य करावे असे आवाहनही शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी केले आहे .









