कोल्हापूर :
जवाहरनगरामधील वाय. पी. पोवार नगर चौकालगत राहत असलेल्या सेवानिवृत्त जीएसटी उपायुक्त शिरीष शंकरराव कुंदे यांच्या बंगल्यात जी चोरी झाली होती. ती चोरी त्यांच्या बंगल्यात घरगडी म्हणून काम करणारा निखील राजू पाटील (वय 25, रा. नवदुर्गा गल्ली, विक्रमनगर, कोल्हापूर) यानेच केल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याने, त्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेले 12 तोळे सोन्याचे दागिणे आणि 5 ग्रॅम वजनाचे अमेरिकन डायमडचे मंगळसुत्र असा 8 लाख 75 हजार ऊपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यास राजारामपूरी पोलिसांना यश आले. त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी लन्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.
सेवानिवृत्त जीएसटी उपायुक्त कुंदे सहकुटूंब दुबईला गेले होते. त्यामुळे त्याच्या बंगल्यात राहण्यास कोणीही नव्हते. पण दुबईला जाताना त्यानी बंगल्याची स्वच्छता करण्यासाठी बंगल्याची चावी घरगडी म्हणून काम करणारा निखील पाटील याच्याकडे दिली होती. त्याने बंगल्याची स्वच्छता करीत असताना बंगल्यातील बेडऊममधील कपाट डुप्लीकेट चावीने उघडली. त्या कपाटामधील 2 लाख 10 हजार ऊपयांचे तीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र, 70 हजार ऊपयाची एक तोळ्याची कानातील रिंगा, 35 हजार ऊपयाच्या अर्धा तोळ्याच्या कानातील छोट्या रिंगा, 70 हजार ऊपयाचे एक तोळ्याचे कानातील झुबे, 70 हजार ऊपयाचे एक तोळ्याचे मंगळसुत्र, 70 हजार ऊपयांचे एक तोळ्याची चेन, 1 लाख 40 हजार ऊपये किंमतीची दोन तोळ्याची चेन, 70 हजार ऊपयांची एक तोळ्याची अंगठी आणि 35 हजार ऊपयांची पाच ग्रॅमचे अमेरिकन डायमडचे मंगळसुत्र असा 8 लाख 75 हजार ऊपये किंमतीचा ऐवज चोऊन नेला. ज्यावेळी कुंदे कुटुंबीय दुबईहून पर आले.
त्यावेळी त्याना कपाटातील सुमारे 8 लाख 75 हजार ऊपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्याची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यानी राजारामपूरी पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. यावेळी चोरट्याने कपाटातील दागिण्याची चोरी करुन, पुन्हा कपाटाचे दरवाजे लॉक केल्याचे आणि बंगल्यातील अन्य कोणत्याच ठिकाणी हात न लावल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांना कुंदे याच्या बंगल्यात झालेली चोरी त्याच्याच घरगडी निखिल पाटील यानेच केल्याचा संशय आला. त्यावऊन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुऊवातीला त्याने पोलिसाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने चोरी केल्याचे कबुल केले. त्याला अटक करीत, त्याच्याकडून चोरीस गेलेले 8 लाख 75 हजार ऊपये किंमतीचे सोन्याचे दागिणे जप्त केले, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली.








