सेन्सेक्स 315 अंकांनी नुकसानीत : जागतिक बाजारात संमिश्र स्थिती
वृत्तसंस्था/मुंबई
जागतिक बाजारपेठेतील संमिश्र भावनांमुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध आर्थिक आणि राजनैतिक उपाययोजनांच्या घोषणेमुळे गुंतवणूकदारांवर यांचा प्रभाव राहिला. यासह, प्रमुख निर्देशांकांसह सेन्सेक्स आणि निफ्टी यांची सात दिवसांची तेजीची धावपळ अखेर थांबली आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेल यांच्या नेतृत्वाखालील एफएमसीजी समभागांमध्ये विक्रीचा कल राहिला होता. बीएसई सेन्सेक्स गुरुवारी 80,058 अंकांनी घसरून सुरु झाला. अंतिम क्षणी सेन्सेक्स 315.06 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.39 टक्क्यांसह 79,801.43 वर बंद झाला.
दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 82.25 अंकांनी घसरून 24,246.70 वर बंद झाला. दिग्गज कंपन्यांपैकी 16 कंपन्यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले आहेत. यामध्ये हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग हे 4 टक्क्यांनी घसरून बंद झाले. याशिवाय, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, झोमॅटो, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एचसीएल टेक यांचे समभाग प्रभावीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये इंडसइंड बँकेचे समभाग हे 3 टक्क्यांहून अधिक वधारले. अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स आणि टायटनचे शेअर्स चांगले वधारले.
जागतिक बाजारपेठेतील संकेत काय?
दरम्यान, बुधवारी अमेरिकन शेअर बाजारांमध्ये तेजी होती. डाउजोन्स 1.07 टक्क्यांनी वाढून 39,606.57 वर, एस अँड पी-500 1.67 टक्क्यांनी वाढून 5,375.86 वर आणि नॅस्डॅक कंपोझिट 2.50 टक्क्यांनी वाढून 16,708.05 वर पोहोचला. एसपी 500 शी जोडलेल्या फ्युचर्समध्ये 0.08 टक्क्यांनी वाढ झाली. नॅस्डॅक 100 फ्युचर्समध्ये स्थिरता होती, तर डाऊ जोन्स फ्युचर्समध्ये 0.15 टक्के घसरण झाली. आशियाई बाजार संमिश्र राहिले. जपानचा निक्केई 0.89 टक्के, दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.41 टक्के आणि ऑस्ट्रेलियाचा एस अँड पी/एएसएक्स 200 0.59 टक्के वाढला. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 0.1 टक्के घसरला.
गुंतवणूक धोरण?
रेलिगेअर ब्रोकिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) म्हणाले, ‘आम्ही निफ्टीबद्दल आमचा सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवतो आणि ‘बाय ऑन डिप्स’ धोरणाची शिफारस करतो. निफ्टीला 23,700-23,800 च्या आसपास मजबूत आधार मिळत आहे. तसेच, जर निर्देशांक एकत्रीकरणाच्या टप्प्यात प्रवेश करत असेल, तर निवडक स्टॉकमधील पोझिशन्सवर लक्ष केंद्रित करणे अधिक फायदेशीर ठरू शकते असे आम्हाला वाटते.’
समभाग वधारलेल्या कंपन्या
- इंडसइंड बँक 819
- अल्ट्राटेक सिमेंट 12159
- ग्रासिम 2729
- टाटा मोटर्स 668
- डॉ. रे•िज लॅब्ज 1200
- सिप्ला 1551
- ? टाटा कन्झ्यु. 1161
- सनफार्मा 1803
- टायटन 3382
- जेएसडब्ल्यू स्टील 1044
- एशियन पेंटस् 2464
- टेक महिंद्रा 1445
- हिरो मोटोकॉर्प 3954
- टाटा स्टील 141
- अपोलो हॉस्पिटल 7159
- जियो फायनॅन्शीयल 258
- कोल इंडिया 399
- बजाज फिनसर्व्ह 2105
- रिलायन्स 1301
- अॅक्सिस बँक 1207
समभाग घसरलेल्या कंपन्या
- एचयुएल 2325
- भारती एअरटेल 1845
- आयशर मोटर्स 5650
- आयसीआयसीआय 1402
- इटरर्नल 236
- ओएनजीसी 249
- श्रीराम फायनान्स 696
- बजाज ऑटो 8201
- महिंद्रा आणि महिंद्रा 2901
- एचसीएल टेक 1586
- अदानी एंटरप्रायझेस 2442
- एसबीआय लाइफ 1608
- एचडीएफसी बँक 1916
- विप्रो 242
- टीसीएस 3401
- इन्फोसिस 1471
- बजाज फायनान्स 9301
- अदानी पोर्टस् 1236
- आयटीसी 430
- कोटक महिंद्रा 2223
- पॉवरग्रिड कॉर्प 314
- एनटीपीसी 363
- हिंडाल्को 628
- मारुती सुझुकी 11894
- ट्रेंट 5323









