कॉलम उभारणी : वर्षभरात काम पूर्ण करण्यासाठी घाईगडबड
बेळगाव : आरटीओची जुनी इमारत पाडून आता त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. कॉलम उभे करण्यात आले असून, वर्षभरात ही इमारत पूर्ण करण्यासाठी कामगार कामाला लागले आहेत. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेशही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे कामाला लवकरच चालना देण्यात येणार आहे. नूतन इमारतीच्या कामाला कधी सुरूवात होणार याकडे अनेकांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. दरम्यान कर्नाटक परिवहन महामंडळामार्फत याचे काम होणार असल्याने नूतन इमारतीचा नेमका खर्च किती येणार? ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आता कामाला चालना देण्यात आली आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जुन्या आठवणी नव्या इमारतीच्या स्वप्नांतून साकारणार
गेल्या 50 वर्षांपूर्वीची आरटीओ इमारत आता भुईसपाट झाली आहे. त्या ठिकाणी केवळ जुन्या इमरातीचे अवशेष होते, तेही हटविण्यात आले आहेत. दरम्यान सर्व जुन्या आठवणी आता नव्या इमारतीच्या स्वप्नांतून साकाराव्या लागणार यात शंका नाही. सध्या संपूर्ण कार्यालय पाडवून तातडीने कामाला सुरूवात केल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
फौंडेशनचे काम अंतिम टप्प्यात
बेळगाव आरटीओ कार्यालयाची नूतन इमारत बांधकामाला गती मिळाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही इमारत बांधण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. इमारतीच्या कामालाही गती देण्यात आली असून सध्या कॉलम उभारणी करण्यात आली आहे. फौंडेशनचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे कामगारवर्गाने सांगितले.









