खेड प्रतिनिधी
शहरातील सन्मित्रनगर येथील झोपडपट्टीत वास्तव्यास असणाऱया बेबी कादरबादशा नदाफ या 45 वर्षीय पत्नीचा पतीनेच घातपात केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी कादरबादशा नदाफ यास अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर घातपाताचीच शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यादृष्टीने पोलीस साऱ्या शक्यतांचा पडताळा करत होते. शिवाय पाचारण करण्यात श्वानपथकही घटनास्थळी घुटमळल्याने संशयाची सुई महिलेच्या पतीवरच होती. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कादरबादशा नदाफ याची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या तपासाअंती घरगुती कारणावरून त्यानेच पत्नीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.